गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नागपूर शहरात आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसानंतर ३२ कोटी मंजूर…तर इतक्या कोटीच्या आराखड्याला मान्यता..

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2023 | 12:37 am
in राज्य
0
unnamed 2023 11 05T003547.720

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नागपूर शहरात 22 सप्टेंबर 2023 रोजी आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसानंतर भविष्यात पुन्हा इतका पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याशिवाय, क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि रस्त्यांसाठी 234.21 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकार मंजुरी देणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

या प्रकल्पाच्या अद्यावतीकरणासाठी एकूण 266.63 कोटी रुपयांच्या कामांचा तपशील त्यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबतच्या संयुक्त पत्रपरिषदेत जाहीर केला. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, 22 सप्टेंबर रोजी अवघ्या 4 तासात 112 मि.मी. पाऊस झाला होता. अतिवृष्टी आणि पुरामुळे नागरिकांचे नुकसान झाले. त्यासाठीची तातडीची मदत देण्यात आली आहे. पण, नागनदी, पिवळी नदीच्या भिंती फुटल्या. हा पाऊस इतक्या वर्षांत प्रथमच झालेला असला तरी पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये, म्हणून काही निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने बैठका घेतल्या आणि मी सुद्धा काही बैठकांना उपस्थित होतो. त्यातून अनेक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

दीडशे वर्ष जुने धरण असलेल्या अंबाझरी धरणाचे बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात जीर्ण भींतींचे काँक्रिटीकरण आणि सुरक्षिततेसाठी 21.07 कोटी, तर माती धरण दुरुस्ती, दगडी पिचिंग, खाली एक ड्रेन इत्यादी कामांसाठी 11.35 कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेने राज्य सरकारकडे 234.21 कोटी रुपयांचा एक प्रकल्प अहवाल सादर केला असून, क्षतिग्रस्त नदी, नाले बांधकाम, पूल, रस्त्यांचे काम आदी कामे तातडीने हाती घेण्यात येतील. अंबाझरी ते पंचशील चौकापर्यंत सुमारे 5 कि.मी.चे अंतर असलेल्या नदीचे खोलीकरण करण्यात येऊन त्यातून गाळ काढण्यात येईल, यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.

नासुप्रच्या स्केटिंग रिंग पार्किंगमुळे पाणी अडल्याची घटना सुद्धा घडली आहे. त्यामुळे हे पार्किंग मोकळे करुन तेथील प्रवाह सुरळीत होण्यासाठी पार्किंग पिल्लर काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हिंगणा एमआयडीसी हा अंबाझरीचा ग्राहक होऊ शकतो. त्यामुळे त्याचीही शक्यता पडताळून पाहण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, पंचशील चौकापर्यंतची सर्व पुलांची कामे यात करण्यात येतील. अंबाझरीच्या पाण्याचे शुद्धीकरण करुन काही भागात देण्याचा सुद्धा विचार सुरु आहे. जायकाच्या मदतीने 2400 कोटींचा नागनदीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यात तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत, त्यात उर्वरित तीन मतदारसंघ समाविष्ट करण्यात येतील आणि ड्रेनेजचा इंडिग्रेटेड प्लान तयार करण्यात येईल. नागनदीच्या भोवती झालेले अतिक्रमण काढण्यात येईल.

विविध प्रकल्पांचे सादरीकरण
या पत्रकार परिषदेनंतर नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि जिल्हाप्रशासनाच्या प्रस्तावित विविध प्रकल्पाबाबत श्री. गडकरी आणि श्री. फडणवीस यांच्या समक्ष, श्री. गडकरी यांच्या निवासस्थानी सादरीकरण करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला मिळाले १० पुरस्कार…बघा इतर मालिकेत कोण मारली बाजी

Next Post

कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी २६ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता…

India Darpan

Next Post
Untitled 18

कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी २६ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता…

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011