नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे आवाहन करत अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सन्मान यात्रा नाशिकमध्ये आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय नाशिक येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, महिला रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष, सुरज चव्हाण विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे,माजी आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार शिवराम झोले,
माजी आमदार जयवंतराव जाधव, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे,गोरख बोडके, राजेंद्र डोखळे, गौरव गोवर्धने, महिला अध्यक्षा योगिता आहेर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, संजय खैरनार, अजय खांडबहाले, निवृत्ती अरिंगळे,सलीम शेख, नितीन चंद्रमोरे,अमोल नाईक, ऐश्वर्या गायकवाड,डॉ. सागर कारंडे, प्रमोद सोनवणे, मनिष रावल, असिफ जानोरीकर, राजाराम धनवटे, मनोहर कोरडे, बहिरू मुळाने, जीवन रायते, पांडुरंग वारूगसे, मुजाहिद शेख, संतोष कदम, गणेश पवार, शंकर मोकळ, नदीम शेख, प्रशांत वाघ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या ३५ वर्षापासून अजितदादा पवार राजकारणात प्रभावीपणे काम करत आहे. त्यांना बदनाम करण्याचे काम करण्यात आहे. विरोधकांकडून आपल्याला नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, विविध योजनांची घोषणा करून महाविकास आघाडी सरकारला जमिनीवर आणण्याचे काम अजितदादा पवार यांनी केलं आहे. राज्यात विविध घोषणा करत असताना आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक यश कसं मिळेल यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार सर्व ज्येष्ठ नेत्यांसमावेत जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपण येणाऱ्या निवडणुकीत मोठ यश मिळवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, महायुती सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले जातील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व काम करतील असे त्यांनी सांगितले.