इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
CBI ने दिल्लीतील सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) ला ४० हजार रुपयाची लाच घेतांना पकडले. सीबीआयने दिल्ली पोलिसांच्या द्वारका सेक्टर-23 येथील पोलिस स्टेशनच्या सहाय्यक उपनिरीक्षकावर (ASI) ही कारवाई केली. या अधिका-याने जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागिततली. त्यानंतर ४० हजार घेतांना तो सीबीआयच्या जाळ्यात आडकला. या पोलिस अधिका-याविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.