इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
यवतमाळः यवतमाळमध्ये घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रभाकर मारवाडी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
प्रभाकर यांची पत्नी जयश्रीचे सूरज रोहनकरसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधात पती प्रभाकर अडसर ठरत असल्याने दोघांनी त्यांची हत्या करण्याचा कट रचला. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने प्रभाकर यांची हत्या घडवून आणली. घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे दोन चिमुकल्यांसमोरच महिलेने पत्नीची हत्या केली.
जयश्रीचे सूरजसोबत अनैतिक संबंध होते. पतीचा त्यात अडथळा येत असल्याने पतीचा काटा काढण्यासाठी जयश्री आणि सूरजने प्रभाकरची राहत्या घरात तोंड दाबून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गावाबाहेर झुडपात फेकून दिला. पोलिसांनी पत्नीसह त्यांच्या दोन मुलांना चौकशीसाठी बोलवले असता त्यांची उलटतपासणी केल्यानंतर पत्नीने पतीच्या खुनाची कबुली दिली. सूरज खुनानंतर फरार झाला होता; पोलिसांनी नंतर दोघांनाही अटक केली आहे.