मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चार दिवसासाठी मान्सूनचा जोर कमी होणार!…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

by India Darpan
जुलै 27, 2024 | 7:46 pm
in संमिश्र वार्ता
0
rainfall alert e1681311076829

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
……
१- उद्या रविवार दि. २८ ते ३१ जुलै पर्यंतच्या चार दिवसात संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १५ जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी होवून केवळ मध्यमच पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात जाणवते. गुरुवार १ ऑगस्टपासून मात्र पुन्हा जोरदार पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यात जाणवते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार ३ ऑगस्टपर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते.
छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली या ३ जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार अशा पावसाची ह्या जिल्ह्यात अजूनही फार मोठी प्रतिक्षा आहे. ऑगस्ट मधील मान्सूनचे वर्तनच येथील भवितव्य ठरवेल, असे वाटते.

२- नंदुरबार धुळे जळगांव सहित संपूर्ण विदर्भातील अशा एकूण १४ जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर म्हणजे शनिवार ३ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मात्र अजूनही कायम आहे.

३- मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात अतिजोरदार पावसाच्या शक्यतेला अजून वातावरणीय उतरतीचा धक्का लागलेला नसून अजून ही शक्यता अजून किती दिवस आहे हे येणारा काळच ठरवणार आहे.

४- मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणे वगळता या आठवड्यात जलआवकेच्या सातत्यातून महाराष्ट्रातील सर्व धरणात जलसंवर्धनातून जलसाठा वाढीची टक्केवारी शतकाकडे झेपावत आहे, काही ठिकाणी धरणे तर ओसंडून वाहत आहे. आणि जुलैत आतापर्यंत तीन आठवडे ओढ दिलेल्या मान्सूनने जुलै अखेरात महाराष्ट्रासाठी यावर्षी आपल्या वर्तनातून वेगळेच असे हे वैशिष्ठय दाखवून दिले आहे.

५-धरणे जरी ओसंडत असले तरी, मराठवाड्यातील लघु प्रकल्प व जायकवाडीत समाधानकारक साठा करणाऱ्या, तसेच महाराष्ट्रातील शेतजमिनीची पूर्णपणे भूक शमवणाऱ्या व विहीरींना पाणी-पाझर फोडणाऱ्या जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही प्रतिक्षा ही आहेच. कदाचित शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत ह्यासाठी वाट पहावी लागू शकते, असेच सध्या तरी वाटते. यासाठी ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचे वर्तन महत्वाचे समजावे.
माणिकराव खुळे
Meteorologist ( Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक- पुणे मार्गावर दरोडेखोरांचा दोघा सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवत धुमाकूळ

Next Post

पुणे जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ केंद्र स्थापन…

India Darpan

Next Post
gov e1709314682226

पुणे जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ केंद्र स्थापन...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011