बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र देव-घेव करणाऱ्या दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी…राज्यपाल रमेश बैस

by India Darpan
जुलै 27, 2024 | 1:55 am
in राज्य
0
मा. राज्यपालांच्या उपस्थितीत स्थापना दिवस 1 2048x1448 1 e1722025525809

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाला आत्मनिर्भर बनविताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहे, असे सांगून सामान्य व सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही, याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना जागरूक राहावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. यासंदर्भात बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ‘सार्थक एज्युकेशन ट्रस्ट’ संस्थेचा १६ वा स्थापना दिवस राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २६) जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ‘नॉट फॉर प्रॉफिट’ संस्थांसाठी असलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर ‘सार्थक’ संस्थेचे लिस्टिंग करण्यात आले.

भारतात एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के दिव्यांग आहेत. आगामी जनगणना प्रथमच डिजिटल माध्यमातून होणार आहे. त्यामुळे देशातील दिव्यांगांची निश्चित संख्या समजेल व त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी योजना आखण्यास मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा यामुळे आगामी काळात दिव्यांगांचे जीवन अधिक सुकर होईल व दिव्यांगता ही अडचण ठरणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. जितेंदर अगरवाल या दंत चिकित्सक व्यक्तीने दृष्टी गमावल्यानंतर हिम्मत न हारता ‘सक्षम’ ही दिव्यांग क्षेत्रातील मोठी संस्था उभारली याबद्दल राज्यपालांनी श्री. अगरवाल यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला सेवानिवृत्त केंद्रीय सचिव लव वर्मा, सीडबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वर्मा, सार्थकच्या सल्लागार मंडळाचे सदस्य क्रिशन कालरा व जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादांच्या अडचणीत वाढ ‘क्लोजर रिपोर्ट’ आणि निषेध याचिकेवर एकत्रित सुनावणी

Next Post

या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत होणार समावेश?

India Darpan

Next Post
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची सुनावणी

या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत होणार समावेश?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011