नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पडित जागेची तात्पुरती बिनशेतीची परवानगी कामकाज मुख्याधिकारी व लिपीक यांचेकडून करून देण्याचे मोबदल्यात २० हजार रुपयाची लाच घेतांना येवला नगर परिषदेमधील नगर रचना विभागाचा कंत्राटी कर्मचारी आकाश गायकवाड हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील आरोपी मजकूर हे कंत्राटी कर्मचारी आहे. यातील आरोपी मजकूर याने तक्रारदार यांचे समाजाचे पडित जागेची तात्पुरती बिनशेतीची परवानगी कामकाज मुख्याधिकारी व लिपीक यांचेकडून करून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे स्वतासाठी पंचासमक्ष ३० हजार रुपये लाचेची मागणी करून, अगोदर १० हजार रुपये दिले आहेत असे म्हणून उर्वरीत २० हजार रुपये दिनांक २६/०७/२०२४ रोजी येवला नगर परिषद कार्यालयातील नगर रचना विभागात पंच साक्षीदारा समक्ष स्विकारले आहे, म्हणून आरोपी मजकूर यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, वय- ४८ वर्ष.
आरोपी- आकाश रविंद्र गायकवाड वय २२ वर्ष व्यवसाय कंत्राटी कर्मचारी, नगर रचना विभाग, येवला नगर परिषद रा. मु. गवंडगांव पो. सुरेगांव ता. येवला जि. नाशिक
*लाचेची मागणी- ३०,००० /- रुपये, अगोदर १०,०००/- दिले असे म्हणून
*लाच स्विकारली- २०,०००/- रुपये
*हस्तगत रक्कम-२०,०००/- रुपये
*लालेची मागणी – दि. ०६/०६/२०२४
*लाच स्विकारली – दि.२६/०७/२०२४
- तक्रार:- यातील आरोपी मजकूर हे कंत्राटी कर्मचारी आहे. यातील आरोपी मजकूर याने तक्रारदार यांचे समाजाचे पडित जागेची तात्पुरती बिनशेतीची परवानगी कामकाज मुख्याधिकारी व लिपीक यांचेकडून करून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे स्वतासाठी पंचासमक्ष ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करून, अगोदर १०,०००/- रुपये दिले आहेत असे म्हणून उर्वरीत २०,०००/- रुपये दिनांक २६/०७/२०२४ रोजी येवला नगर परिषद कार्यालयातील नगर रचना विभागात पंच साक्षीदारा समक्ष स्विकारले आहे, म्हणून आरोपी मजकूर यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी – –
*हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी -श्री. स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सह सापळा अधिकारी -श्री. राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक*
पोहवा/प्रभाकर गवळी,
पोहवा/ प्रफूल्ल माळी
पोहवा/ संतोष गांगुर्डे
पोहवा/परशुराम जाधव
पोना/किरण धुळे
पोना/विलास निकम