मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री दादा भुसेंनी अचानक मालेगाव धान्य वितरण कार्यालयात धाड टाकल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ निर्माण झाली. धान्य वितरण कार्यालयाच्या वाढत्या तक्रारीमुळे अचानक दादा भुसे यांनी झाडाझडती घेतली.
यावेळी धान्य वितरण कार्यालयात आक्षेपार्ह प्रकार समोर आला. धान्य वितरण कार्यालयाला दलालांचा विळखा असून त्यामुळे सामान्य लोकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे दादा भुसे यांनी अचानक धाड टाकली. या धाडीनंतर कार्यालयातील देसले नामक लिपिकाची तडकाफडकी बदली करण्यात आली.