इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेसने महाविकास आघाडीतील समन्वयासाठी १० जणांची समिती जाहीर केली आहे. यात मुंबईसाठी ३ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या आदेशाने ही समिती करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी ७ जणांचे नाव तर मुंबईसाठी ३ नाव घेण्यात आले आहे.
या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. तर मुंबईच्या जागा वाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप, आणि अस्लम शेख यांची नियु्क्ती करण्यात आली आहे.
ही समिती महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व इतर पक्षांच्याशी चर्चा करुन जागा वाटपाबाबत निर्णय घेणार आहे.