नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या २० प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात नांदेड येथील सहा. मोटार वाहन निरीक्षक यांना ९ हजाराची लाच घेतांना जळगावच्या युनीटने रंगेहात पकडले आहे. त्यांच्यावर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे श्री.गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे ऑफिस बॉय म्हणून कामास आहेत. सदर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या २० प्रशिक्षणार्थी चालकाना ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते. सदर फेल झालेल्या चालकांना पास करण्याचे मोबदल्यात सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केले बाबत तक्रार यांनी समक्ष हजर राहून तक्रार दिली होती. सदर तक्रारीची २५ जुलै रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या २० प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात सहा. मोटार वाहन निरीक्षक यांना तक्रारदार यांचे कडून तडजोडीअंती पंचासमक्ष ९ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सहा. मोटार वाहन निरीक्षक यांचेवर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगांव
तक्रारदार- पुरुष वय 22 वर्ष रा. नांदेड जिल्हा नांदेड
आलोसे – भुषण जवाहर राठोड वय 34 व्यवसाय नोकरी सहा. मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड वर्ग 2
*लाचेची मागणी- 10,000/- रुपये
*स्वीकारलेली रक्कम- 9,000/- रुपये /-
*हस्तगत रक्कम- 9,000/- रुपये
*लाचेची मागणी – 25/07/2024
*लाच स्विकारली – 25/07/2024 रोजी
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे श्री.गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे ऑफिस बॉय म्हणून कामास आहेत. सदर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या २० प्रशिक्षणार्थी चालकाना ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते. सदर फेल झालेल्या चालकांना पास करण्याचे मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 10,000 हजार रुपये लाचेची मागणी केले बाबत तक्रार यांनी समक्ष हजर राहून तक्रार दिली होती.सदर तक्रारीची आज दिनांक 25/07/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात आलोसे यांना तक्रारदार यांचे कडून तडजोडीअंती पंचासमक्ष 9000/- रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेवर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
*सापळा अधिकारी- पोनि/ अमोल वालझाडे, ए. सी. बी. जळगांव
*सापळा पथक – पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे पोना बाळू मराठे जळगांव युनिट







