नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे सर यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे रेलभवनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मतदार संघातील रेल्वे संबधी विविध समस्यावर चर्चा केली. यात मतदार संघातील नागरिकांना प्रवासी सुविधा पूर्ववत करण्यात याव्यात, तसेच मतदार संघातील विविध रेल्वेसाठी थांबे यावर चर्चा करण्यात आली. तसेच काही रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात याव्यात असे विषय समाविष्ट होते.
तसेच मनमाड़ येथे नवीन प्रस्तावित एलएचबी पीओएच कारखान्यासाठी मंजूरी देण्यात यावी, तसेच केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना मनमाड़च्या रिक्त जागा भरण्यात याव्या, केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना मनमाड़ला भरपूर वर्कलोड देण्यात यावा अशा विविध विषयावर खासदार भास्कर भगरे सर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेशी चर्चा केली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व विषयावार सकारात्मक चर्चा केली आणि समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार भास्कर भगरे सर यांना दिले आहे.








