नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंगणवाड्यांचे बांधकामचे पैसे ठेकेदाराला काढून देण्यासाठी अक्कलकुवा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे व सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र लाडे हे २६ हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र लाडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम त्यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता, सहाय्यक लेखाधिकारी यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल 2,46,850/- रु. ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले. परंतु सहाय्यक लेखाधिकारी यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्या साठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी 8,000/- रु. ची मागणी केली व गटविकास अधिकारी यांच्यासाठी 18,000/- रू. ची मागणी केली. आज रोजी पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान सहाय्यक लेखाधिकारी 8,000/- रु लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. तसेच गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडून 18,000/- रू. लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून सहाय्यक लेखाधिकारी यांच्या तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नंदुरबार
*तक्रारदार-* पुरूष वय-32 वर्ष
आलोसे-* 1) श्री. विजय लोंढे, वय 39 वर्षे, गट विकास अधिकारी , ( वर्ग 1 ) पंचायत समिती अक्कलकुवा , जिल्हा- नंदुरबार. रा. अक्कलकुवा पंचायत समिती जवळील, शासकीय निवासस्थान. 2) श्री. रवींद्र सुखदेव लाडे , वय 47 वर्ष , सहाय्यक लेखाधिकारी , पंचायत समिती अक्कलकुवा , जिल्हा नंदुरबार.
लाचेची मागणी-दोन्ही आलोसेयांची एकुण 26,000/- रु. अशी लाचेची मागणी आलोसे क्र 2 यांनी केली ( आलोसे क्र 1 साठी 18,000/- रुपये व आलोसे क्र. 2 याने स्वतः साठी 8,000/- रु.)
*स्विकारलेली लाचेची रक्कम- आलोसे क्र. 1 यांनी 18,000/-रु. व आलोसे क्र. 2 यांनी 8000/- रु. असे एकुण 26,000/- रु.
*तक्रार:– तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. नमुद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे क्रमांक दोन यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम आलोसे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता , आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल 2,46,850/- रु. ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले. परंतु आलोसे क्रमांक 2 यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्या साठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी 8,000/- रु. ची मागणी केली व आलोसे क्र 1 यांच्यासाठी 18,000/- रू. ची मागणी केली. आज रोजी पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र 2 यांनी 8,000/- रु लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. तसेच आलोसेे क्र 1 यांनी तक्रारदार यांच्याकडून 18,000/- रू. लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून आलोसे क्र 2 यांच्या तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी-
1) मा. सचिव , ग्राम प्रशासन विभाग , महाराष्ट्र शासन, मुंबई. 2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार.
*सापळा अधिकारी :- श्री राकेश चौधरी, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.,नंदुरबार
*कार्यवाही पथक :-
पोहवा/ विलास पाटील,
पोहवा/ विजय ठाकरे पोना/देवराम गावित,
पोना/ हेमंत कुमार महाले,
पोना/ सुभाष पावरा, पोना/ नरेंद्र पाटील , पोना/ जितेंद्र महाले , सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार.