इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शेगाव वरून अकोला येत असलेल्या शिवशाही बसला महामार्ग क्रमांक ६ वरील तुषार हॉटेल जवळ भीषण आग लागल्याने बस जळून खाक झाली. या बसमध्ये ४४ प्रवासी होते. मात्र चालकाच्या सातर्कतेने प्रवस्याचे प्राण वाचले. बस चालकाला अचानक जळल्याचा वास आल्याने, चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून, सर्व प्रवाश्यांना बाहेर काढले.
बसच्या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर बस चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मधील सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर काही नागरिकांनीही मदत केली, मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली.
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज सांगितल्या जात आहे.