येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील कालिका कॅफे या ठिकाणी कॅफे संचालक कालिदास अनवडे यांची नजर चुकवत एक अज्ञात चोरट्याने दुकानात शिरून चार्जिंगला लावलेला एमआय कंपनीचा २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. या चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून येवला शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.