इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे शहरांसह परिसरात अतिवृष्टी व पूरस्थितीबाबत पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने संपूर्ण माहिती दिली आहे.
…
*पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
*पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
*भिडे पूला शेजारील पूलाचीवाडी येथील ३ युवकांना शॉक लागून मयत झाले आहेत. त्यांची नावे अभिषेक घाणेकर, आकश माने व शिवा परिहार अशी आहेत.
*लवासा रोड, ता.मुळशी येथे दरड कोसळली असून एन डी आर एफच्या टीमला बचाव कार्यासाठी कळविण्यात आलेले आहे.
*निंबजनगर परिसरातील सोसायटी व सिंहगड रोड वरील सोसायट्या मध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकलेली आहेत त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.
*भिमाशंकर-खेड रोडवर दरड कोसळली असून खेड मधून भिमाशंकरकडे जाणार रस्ता बंद आहे.
*वडघर ता. वेल्हा येथे डोंगराची माती रस्त्यावर आली होती. ती माती बाजूला करून रस्ता वाहतूक सुरू केली आहे.
*मौजे-दासवे ता. मुळशी लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर दरड कोसली आहे. सदर बंगल्यात ३ जण अडकले असल्याबबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. एनडीआरएफ टीम काम करत आहे.
*त्याच बरोबर पर्यटन स्थळ ठिकाणी २४ तासाकरिता बंदी आदेश जारी करण्यात आहे.