नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कवितांचे जग ‘पुणे अंतर्गत ‘कवितेने मला काय दिले ‘या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन श्रीमती सुषमाबेन यांच्या पुढाकारातून करण्यात आले. अनेक महिलांनी मान्यवर लेखकांच्या कविता सादर केल्या. कवयित्री आश्लेषा महाजन यांनी कवितेने मला काय दिले या विषयावर प्रभावीपणे आपले विचार मांडले. रसिक श्रोत्यांनी सर्वांच्या काव्यवाचनास भरभरून दाद दिली. कवी प्रकाश होळकर व विनायक रानडे यांचे मनोगत सर्वांसाठी मेजवानीच ठरली. श्रोत्यांच्या वतीने सुषमाबेन यांचा सत्कार करण्यात आला. असा हा छान कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारकाच्या ‘स्वगत ‘हॉलमध्ये आयोजित केल्याबद्दल सर्वांनी ‘कवितांचे जग ‘पुणे च्या सदस्या सुषमाबेन यांचे अभिनंदन केले आहे.