देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची राज्य सरकारने काढलेली विक्री निविदा रद्द करावी या मागणीसाठी आज कारखाना स्थळावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कारखान्याचे सभासद,शेतकरी यांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. शासनाने विशेष पॅकेज जाहीर करुन कारखाना पुन्हा ऊर्जित अवस्थेत सभासदांना चालविण्यास द्यावा अशी आग्रही मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.