इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केदारनाथ आणि बद्रीनाथाचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे होते.
या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांना एक वेगळा अनुभव आला व त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. शिवसेनेनेही ट्विट करत हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र असो की हिंदुस्थान.. सामान्य माणसांचं ठाकरेंवरील प्रेम कायम आहे!