नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या 5293 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा राज्यवार तपशील परिशिष्ट-अ मध्ये दिला आहे. यामध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालया अंतर्गत उभारण्यात आलेल्या 4729 ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचा समावेश असून, त्यासाठी रु. 178 कोटी खर्च करण्यात आले.
याव्यतिरिक्त, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालया अंतर्गत तीन तेल विपणन कंपन्यांच्या सहकार्याने (OMCs) उभारण्यात येणाऱ्या एकूण 7432 ईव्ही चार्जिंग स्टेशनपैकी, 5833 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, देशातील महामार्गांलगत उभारण्याचे अवजड उद्योग मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.
या 5833 ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची राज्यनिहाय यादी परिशिष्ट-ब मध्ये दिली आहे. या तेल कंपन्यांना 7432 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी, भांडवली अनुदान म्हणून, 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत, वरील ईव्ही चार्जिंग स्टेशन्ससाठी राष्ट्रीय महामार्गांलगत कोणतेही ऊर्जा केंद्र उभारण्याची सरकारची योजना नाही.