इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहे. देशमुख यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा आरोप प्रवीण मुंडे यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार काळात मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या आरोप प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचादेखील जबाब सीबीआयकडून नोंदवला गेला होता. मुंढे यांनी आपल्या जबाबात अनिल देशमुख यांच्यावर हे गंभीर हे आरोप केले आहेत.
मुंडे यांनी जबाबात म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी जवळपास चार ते पाच वेळा फोन केले होते. त्यावेळी धमकीची सुद्धा भाषा वापरली होती. त्यांनी जबरदस्तीने गिरीश महाजन यांना या गुन्ह्यात कशाप्रकारे अडकवण्यात येईल, यासाठी कट रचला होता, अशा प्रकारचा अहवाल सीबीआयने कोर्टात दाखल केला आहे.