इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काठमांडूः नेपाळमध्ये पुन्हा एक मोठा विमान अपघात होऊन त्यात १८ जण ठार झाले. विमानाचा पायलट गंभीर जखमी झाला आहे. काठमांडू येथे टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. या विमानात १९ जण होते.
हे विमान सौर्य एअरलाइन्सचे आहे. बुधवारी सकाळी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही; परंतु विमान धावपट्टीवरून घसरले आणि नंतर क्रॅश झाले असे सांगितले जाते. सध्या तांत्रिक पथक अपघाताच्या कारणाचा तपास करत आहे. नेपाळमधील हा पहिला विमान अपघात नाही, याआधीही जानेवारी २०२३ मध्ये विमान कोसळले होते. यामध्ये ६८ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात काठमांडूपासून २०५ किलोमीटर दूर पोखरामध्ये यति एअरलाइन्सचे विमान कोसळले. आज दुर्घटनाग्रस्त झालेले विमानही पोखराला जाणार होते.