इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट सेवकांची पतसंस्था मर्यादित, सप्तशृंगगडच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडली त्यात प्रशांत विठ्ठल निकम यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे विद्यमान व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या मार्गदर्शना व सहा व्यवस्थापक भगवान नेरकर यांच्या समन्वयातून वर्ष २०१६-२०२१ व २०२२-२०२७ या मागील दोन पंचवार्षिक कालावधीसाठी बिनविरोध निवडणूक घेण्यात आली असून, पतसंस्थेच्या आर्थिक बचत सह सभासदामधील अंतर्गत सलोखा सुरक्षित ठेवून विकासात्मक व पतसंस्थेच्या आर्थिक विकासासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचारी प्रकारातील सभासद यांना किमान व्याजदरासह पत उपलब्धता, आरोग्य व अपघाती विमा तसेच ठेवींची सुविधा तसेच भाविकांना किमान दरात वस्तू, सेवा व साहित्य उपलब्धता करून दिली जात आहे.
सदर निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णयांतीक अधिकारी म्हणून सहकार विभागामार्फत दुय्यम निबंधक कार्यालय, कळवण यांनी श्री डी एस पाटील जबाबदारी निभावली तर प्रक्रियेच्या उपक्रमासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री निवृत्ती चोडगीर यांनी कार्यालयीन पूर्तता केली.
प्रसंगी सभासद पैकी विद्यमान संचालक माजी चेरअमन ,श्री नानांजी काकलीज, श्री प्रकाश जोशी, श्री प्रकाश पगार, श्री नानाजी भामरे, श्री सुनील कासार, श्री समधान सद गिर, श्री सागर नीचीत, श्री.भास्कर गावित, सौ.ताई पवार, कु.सुनंदा चव्हाण आदी उपस्थित होते.
सदर नेमनुकी बाबत नूतन चेअरमन श्री प्रशांत निकम यांचे विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे, सहा व्यवस्थापक श्री भगवान नेरकर, पतसंस्था संचालक मंडळ व सभासदांनी विशेष सत्कार आयोजित करून हार्दिक अभिनंदन करत भाविष्यकाळातील विकासात्मक कार्यास शुभेच्छा देवू केल्या. तसेच माजी चेअरमन श्री नानाजी काकलीज यांचा देखील सन्मान करण्यात आला.