जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण स्थगित केले आहे. उपोषण मागे घेतांना त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे. पण येत्या १३ ऑगस्टपर्यंत मी सरकारला वेळ देतो, तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.
उपोषण संपल्यानंतर पुन्हा राज्य दौरा सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही घरी बसायची वेळ नाही. येत्या ७ ऑगस्टपासून १३नऑगस्टपर्यंत पुन्हा राज्यात दौरा करणार असेही त्यांनी सांगितले. गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी जरांगे पाटील उपोषण करत होते. पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत खालवली. त्यानंतर गावक-यांनी सलाईन लावली. त्यामुळे जरांगे म्हणाले की, माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे होते की, आम्हाला तुम्ही आणि आरक्षण दोन्हीही पाहिजे. पण मला जर असंच सलाईन लावत असतील, तर उपोषण स्थगित करु. कारण सलाईन लावल्याने उपोषणाला आता अर्थ नाही.