नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २४ जूलै अखेर २६.३२ टक्के साठा आहे. पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा १६ टक्के कमीच झाला होता. त्यात आता हा साठा २६.३२ टक्के झाला आहे.
जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी मुसळधार पाऊस नाही. त्यामुळे काही ठिकाणी तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यातही हीच स्थिती आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ४२.४५ टक्के तर समुहात ३५.०५ टक्के साठा आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे. पाच धरणांची पातळी तर शुन्य आहे. तर भावली धरण ९६.५१ टक्के भरले आहे. तर बहुतांश धरणात मात्र दहा ते पंचवीश टक्क्यांच्या आत पाणीसाठा आहे.