मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार व मंत्री गिरीश महाजनांमध्ये विकास निधीवरुन खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या अशी मागणी महाजन यांनी केल्यानंतर अजित पवार यांनी निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का असा सवाल अजित पवारांनी केल्यामुळे हा वाद झाला.
या बैठकीत गिरीश महाजन यांनी सुध्दा नंतर अजित पवार यांना सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी काय करण्यात आली असा सवाल केला. त्यावर ही खडाजंगी झाली. महायुतीमध्ये सर्व अलबेल आहे असे बोलले जाते. पण, तीन पक्षाच्या या युतीमध्ये वादाच्या अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहे.