नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोल नाही ही हप्तेखोरी आहे;रस्ते नाही तर टोल ही नाही…अशा घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाने मुंबई – नाशिक मार्गावरील घोटी नाका मंगळवारी बंद पाडला. या रस्त्या खड्डेमय झाला असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा ही मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनाबाबत बोलतांना शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलकांनी सांगितले की, मुंबई -नाशिक महामार्गावरील रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला आहे. निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम टोल वाले करत आहे. लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्ती होईपर्यंत आणि खड्डे मुक्त होई पर्यंत टोल वसुली बंद करण्याबाबत आज संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर यावर कारवाई करण्याबाबत टोल अथॉरिटी कडून लेखी आश्वासन घेण्यात आले.