मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याचे दर मुंबईत ५ हजार, पुणे व जळगाव येथे ३ हजारांनी कमी झाले. सोन्याचे दर गेल्या काही महिन्यात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली होती. पण, आता दर कमी झाल्यामुळे पुन्हा ग्राहकांची गर्दी दुकानात दिसेल असा विश्वास सराफ व्यापा-यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने स्टॅम्प ड्युटी ९ टक्क्यांनी कमी केली आहे. त्यामुळे पुण्यात अगोदर ७२ हजार ५०० रुपये असलेला दर आता ६९ हजार ५०० रुपये झाला आहे. जळगावमध्ये ७३ हजार रुपये दर आता ७० हजारावर गेले आहे. सोन्याबरोबरच चांदीचे दरही कमी झाले आहे. जळगावमध्ये ९० हजार दर आता ८७ हजार झाले आहे.