नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अंबड औद्योगीक वसाहतीत कंपनीचे शेड पाडून भामट्यांनी सुमारे पाच लाख रूपये किमतीचे लोखंडी अॅगल व रॅबिट चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघाना पोलीसांनी जेरबंद केले आहे.
संतोष एकनाथ जगताप (रा.आंबेडकरनगर,वरचे चुंचाळे) व माधव भिमराव इंगळे (रा.मारूती मंदिरासमोर,कामटवाडे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून रिंकल सिंग व उन्मेश सिंग हे संशयित पसार झाले आहेत. याबाबत अंजुम राजेसाहब जकाणी (रा.हिरवेनगर,मुंबई नाका ) यांनी फिर्याद दिली आहे. जकाणी यांनी आपल्या मालकिच्या अंबड औद्योगीक वसाहतीतील फ्लॉट क्र. जे – ४० या भूखंडावर ८० – ४० फुट लांबी रूंदीचे विटा सिमेंटचे आरसीसी बांधकाम असलेले शेड उभारले होते.
दि. १ ते २१ जुलै दरम्यान संशयितांनी अनधिकृतपणे शेड मध्ये प्रवेश करून ते पाडून टाकले. तसेच सुमारे पाच लाख रूपये किमतीचे शेडचे लोखंडी अँगल व रिबिट चोरून नेले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.