नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भाभानगर परिसरात स्पा सेंटरवर काम करणा-या पादचारी तरूणीची वाट अडवित तिघा परिचीतांनी विनयभंग केला हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश आहिरे (रा.सिडको),आझाद शेख व संदिप नामक तरूण (रा.दोघे भाभानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित व तक्रारदार पिडीता एकमेकांचे परिचीत असून ती भाभानगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये नोकरीस आहे. रविवारी (दि.२१) रात्री पिडीता काम आटोपून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.
स्पा सेंटर बाहेर तीघा संशयितांनी तिची वाट अडवित हे कृत्य केले. संशयित संदिप याने हॉटेल मध्ये सोबत येण्यासाठी आग्रह धरला तर उर्वरीत दोघांनी युवतीस शिवीगाळ करीत विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.