इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यात मोठया घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी ११ वाजता बजेट सादर केला. यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर केला होता. त्यावेळी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्पात भारत २०४७ चे चलचित्र असेल, रोडमॅप असेल हे स्पष्ट केले होते. या बजेटकडून संपूर्ण देशवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आल्या. हा बजेट सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले…..