इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यात मोठया घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी ११ वाजता बजेट सादर केला. यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर केला होता. त्यावेळी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्पात भारत २०४७ चे चलचित्र असेल, रोडमॅप असेल हे स्पष्ट केले होते. या बजेटकडून संपूर्ण देशवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आल्या. या बजेटमध्ये नवीन कर प्रणालीमध्ये कर सवलत आणि सुधारित कर स्लॅबची घोषणा करण्यात आली.
नवीन कर प्रणालीमध्ये कर सवलत आणि सुधारित कर स्लॅब
- नवीन कर प्रणालीमध्ये पगारदार कर्मचाऱ्यांसाठी ₹ 17,500/- पर्यंतची आयकर बचत
- सुमारे चार कोटी पगारदार व्यक्ती आणि पेन्शनधारकांना आयकर सवलत
- पगारदार कर्मचाऱ्यांसाठी मानक वजावट ₹ 50,000/- वरून ₹ 75,000/- पर्यंत वाढवली जाईल