इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यात मोठया घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी ११ वाजता बजेट सादर केला. यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर केला होता. त्यावेळी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्पात भारत २०४७ चे चलचित्र असेल, रोडमॅप असेल हे स्पष्ट केले होते. या बजेटकडून संपूर्ण देशवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आल्या.
- मुद्रा लोनची मर्यादा आता २० लाख रुपये.
- महिला, मुलींसाठी ३ लाख कोटीच्या योजना.
- ३० लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.
- ५०० कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, ५ हजार महिना मिळणार.
- खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी १०० लॅब उघडणार.
- नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.
- १०० शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.
- आंध्र प्रदेशला अतिरिक्त १५ हजार कोटीचा निधी देणार.
- चेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणार.
- बिहारमध्ये रस्ते बांधणासाठी २६ हजार कोटी, मेडीकल कॉलेजही होणार
- देशात उच्च शिक्षणासाठी १० लाखापर्यंत कर्ज देण्याची घोषणा
- दरवर्षी २५ हजार विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात ७.५ लाख रुपयांचे कर्ज मिळेल
- पहिल्या कामावर थेट ईपीएफओ खात्यात १५ हजार रुपये दिले जातील
- पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत ३ कोटी नवीन घरे बांधली जाणार
- पीएम शहरी गृहनिर्माण योजनेसाठी १० लाख कोटींची घोषणा
- रेंटल हाऊसिंगचा प्रचार आणि नियमन करण्यासाठी नियम बनवेल
- मुद्रांक शुल्क कमी करण्याच्या राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल