गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

माकपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांच्याशी केली या विषयावर चर्चा

by India Darpan
जुलै 23, 2024 | 11:20 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240723 WA0161

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत महाराष्ट्राचा स्वाभिमान जोपासला जाणार की त्याची राखरांगोळी होणार, याचा फैसला होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जनतेची भक्कम एकजूट करूया,” असे एकमत आज शिवसेना अध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे आणि माकपचे राज्यस्तरीय नेतृत्व यांच्या दरम्यान मातोश्रीवर झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आले. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीविषयी मतांची देवाणघेवाण करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने भाजप आघाडीचे तीन तेरा वाजवून महाविकास आघाडीला विजयी केले, त्याचीच जोरदार पुनरावृत्ती येत्या विधानसभा निवडणुकीत करण्यासाठी सर्वजण एकजुटीने कार्य करतील, आणि राज्यात सत्तांतर घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माकपच्या प्रतिनिधीमंडळात पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ. उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. अजित नवले व डॉ. डी. एल. कराड यांचा समावेश होता.

महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर आघाडीची सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी श्री. उद्धव ठाकरे यांनी दिले. या बैठकीत जनतेच्या विविध प्रश्नांवर व्यापक आणि प्रदीर्घ चर्चा झाली. दूध दर आणि शेतकरी कर्जमाफीसाठी अ. भा. किसान सभेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आंदोलनास श्री. उद्धव ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा देत आपला पक्ष त्यात सक्रियपणे सहभागी होईल, अशी ग्वाही दिली.

राज्यातील कामगारांच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली. विशेषतः जुनी पेन्शन योजना, कंत्राटी कामगार, योजना कर्मचारी यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी जबरदस्त मोहीम उभारण्यावर बैठकीत विचारविनिमय झाला. तसेच, शेतकऱ्यांनी त्यांच्यावर लादलेले काळे कायदे जसे उधळून लावले त्याप्रमाणेच कामगारांवर लादलेल्या श्रम संहिता रद्द करण्यासाठी पुढाकार घेण्याचा मनोदय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘माकप’च्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राज्य अध्यक्षजयंत पाटील आणि कॉंग्रेसचे राज्य अध्यक्ष नाना पटोले यांची यापूर्वीच भेट घेऊन वरील मुद्यांवर चर्चा केली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIVE: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत…अर्थसंकल्पाचे थेट प्रेक्षेपण बघा

Next Post

कर्नाटकात ‘नीट’ परीक्षेवर बंदी…काँग्रेस सरकारने घेतला हा निर्णय

India Darpan

Next Post
Untitled 78

कर्नाटकात ‘नीट’ परीक्षेवर बंदी…काँग्रेस सरकारने घेतला हा निर्णय

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011