इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सकाळी ११ वाजता बजेट सादर करतील. त्याविषयीची संपूर्ण तयारी झाली आहे. यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर केला होता. त्यावेळी त्यांनी पूर्ण अर्थसंकल्पात भारत २०४७ चे चलचित्र असेल, रोडमॅप असेल हे स्पष्ट केले होते. या बजेटकडून संपूर्ण देशवासीयांना मोठ्या अपेक्षा आहे.