प्रशांत चौधरी, वास्तुसल्लागार
….
(१) दरवाज्याला फुलांचे (खर्या फुलांचे) तोरण लावावे, फुले सुकली कि तोरण बदलावे.
(२) दरवाज्याबाहेर रांगोळी काढावी, निदान एक रेष मारावी, पण धार्मिक चिन्हे नकोत, रोज काढायची असल्याने हल्ली रांगोळीचे ठोके मिळतात ते वपरण्यास हरकत नाही पण त्यात देवाचे नाव, चित्र, धार्मि चिन्हे नसतील याची काळजी घ्या.
(३) दरवाज्या बाहेर चपला ठेवू नका, चपला शक्यतो घरातच काढा किंवा सोय असल्यास बाहेर चपलांचा Stand ठेवून त्यात चपला ठेवा पण चपलांची दारापुढे रास होणार नाही याची काळजी घ्या.
(४) घरात प्रवेश केल्या केल्या दरवाज्यासमोर कोणता अडथळा नको, साधारण दरवाज्याची उंची जर सहा फुट असेल तर प्रवेश केल्यावर किमान ४ ते ५ फुट अंतरापर्यंत कोणतीही वस्तू नसावी.
(५) उघडताना दरवाजा पूर्ण उघडणे म्हणजे ९० अंशात उघडणे गरजेचे आहे, त्यामूळे दरवाज्याच्या मागे काही काम करुन घेत असाल तर काळजी घ्या. काही ठिकाणी दरवाज्याच्या कोणत्याही बाजूला भिंत नसते त्यावेळी दरवाजा अगदी १८० अंशातदेखील उघडला जाऊ शकतो पण किमान ९० अंश दरवाजा उघडला जाणे आवश्यक आहे.
(६) दरवाज्याच्या बाहेर Safety Door हा जरी वास्तू दोष असला तरी आजच्या काळात आवश्यक आहे. त्यामूळे मूख्य दरवाज्याप्रमाणे त्या दरवाजाची देखील काळजी घ्यावी.
(७) दरवाज्याला कधी लाथ मारु नये, पायाने दरवाजा बंद करु नये.दरवाजा कधी आपटू नये.
आता दिशांनुसार काही निर्धोक उपाय बघू
उत्तर दिशेचा दरवाजा असलेले :- थोडा दानधर्म करत जा, चार माणसे जोडून ठेवा, वेळप्रसंगी खिशाला चाट पडली तरी चालेल पण एखाद्याचे अडलेले काम तूमच्याकडून होत असेल तर करा उदा.. लहान मूलांचे शिक्षण, कोणा आजार्या औषधोपचार, भूकेलेल्यास अन्न द्या.
ईशान्य दिशेचा दरवाजा असलेले:- सगळ जग तूमच्यासारख नाही हे लक्षात ठेवा, कोणावरही चटकन विश्वास टाकू नका. आमच्या श्री महाराजांनी सांगितलच आहे कि जगात व्यवहार करताना समोरच्याची लबाडी ओळखता येईल इतकी लबाडी प्रत्येकाकडे असायलाच पाहीजे.
पूर्व दिशेचा दरवाजा असलेले:- आपल्या सामर्थ्याचे, पैशाचे प्रदर्शन करु नका. अंगी नम्रपणा ठेवावा, उगीच इतरांचे भले करण्याच्या मागे लागू नका, न मागता मदत करायला जाल आणि तूमचे नाव खराब होईल.
आग्नेय दिशेचा दरवाजा असलेले:– डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवून सगळ्यांशी बोला. रोजच्या मिळकत आणि खर्चाचे व्यवस्थित हिशेब ठेवा. मोठ्यामोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना छोटे आनंद गमावू नका.
दक्षिण दिशेचा दरवाजा असलेले:- कोणतेही व्यसन करु नका. माणसांशी माणसासारखेच बोला उगीच स्वत:ची दादागिरी गाजवायला जाऊ नका.
नैऋत्य दिशेचा दरवाजा असलेले:- स्वत:चे आणि पुढच्या पिढीचे पाय जमीनीवर रहातील याची काळजी घ्या अन्यथा अहंकार हा तूमचा शत्रू तूम्हाला कधी गिळंकृत करेल कळणार नाही
पश्चिम दिशेचा दरवाजा असलेले:– वेळ काढूपणा, दिरंगाई या गोष्टी स्वभावातून काढून टाका, रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळी योगासने आणि प्राणायाम करा. (योगासने आणि प्राणायाम सर्वांनाच आवश्यक आहे पण पश्चिम दिशेचा दरवाजा असलेल्यांना अति आवश्यक आहे)
वायव्य दिशेस दरवाजा असलेले:- घरातील महिलांचा सन्मान जपा, मस्करीतदेखील त्यांना काही वाईट बोलू नका, घराबाहेरील महीलांचादेखील अपमान करु नका (हे देखील सर्वांनीच केल पाहीजे पण वायव्य दिशेस दरवाजा अति कटाक्षाने काळजी घ्यायला हवी)
रोजच्या जमा-खर्चाचा हिशेब ठेवा, बाहेरील खाणे टाळा.(प्रशांत चौधरी वास्तुसल्लागार)