इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होणा-या सरकारी कर्मचा-यांवरील बंदी हटवली आहे. ही बंदी तत्कालीन काँग्रेस सरकारने १९६६ मध्ये लागू केली होती. केंद्र सरकारने ५८ वर्षानंतर ती रद्द केली आहे.
ही बंदी हटवल्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझा एक साधा प्रश्न आहे भाजप आणि आरएसएस या दोघांना RSS पूर्णपणे भारतासाठी धर्मनिरपेक्ष राज्य स्वीकारतो आणि तो भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारतो आणि भारताच्या राज्यघटनेशी एकनिष्ठ आहे का?
माझ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कळेल. उत्तर नाही आहे !!!
आरएसएस धर्मनिरपेक्ष भारतविरोधी आहे.
आरएसएस तिरंगा विरोधी आहे.
आरएसएस संविधान विरोधी आहे.
सरकारी नोकर आरएसएस आणि त्यांच्या फुटीरतावादी विचारसरणीशी एकनिष्ठ असेल तर भारताशी एकनिष्ठ कसा असेल?