इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – नाशिक शहरातील त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात भगवान गौतम बुद्धांना ज्या महाबोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे विजयादशमीच्या दिवशी रोपण करण्यात आले. या महाबोधी वृक्षाला नवीन पालवी फुटली आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ याठिकाणी पाहणी केली. यावेळी आनंद सोनवने, भत्ने संघरत्न, भन्ते धम्मरक्षित, समाधान जेजूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बोधीवृक्षाची पाहणी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सामूहिक बोधीवृक्ष वंदना यावेळी घेण्यात आली.
२४ ऑक्टोबरला महाराष्ट्र शासन व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नाशिकच्या बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे ऐतिहासिक महाबोधी वृक्ष रोपण सोहळा पार पडला होता. या सोहळ्यास श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायक, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, मंत्री गिरीश महाजन,श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूज्यनीय भिक्खू डॉ.वास्कडूवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा पूज्यनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो पूज्यनीय भिक्खू नाराणपणावे, पूज्यनीय भिक्खू डॉ.पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महास्थवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हे आहे महाबोधीवृक्षाचे महत्त्व
महाबोधी हे एक पवित्र वृक्ष आहे. हा गौतम बुद्धाचा सर्वात जवळचा अस्सल जिवंत दुवा आहे. महाबोधीवृक्ष हा ज्ञानाचा वृक्ष आहे. सुमारे २६०० वर्षांपूर्वी, भगवान गौतम बुद्ध भारतातील बोधगया बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या इसाथु वृक्षासमोर पाठीशी बसले होते. या क्षणी, जेव्हा ते झाडाच्या विरूद्ध बसले, तेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. ते बोधीवृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आणि बुद्धाच्या हयातीतही यात्रेकरू ते पाहण्यासाठी आले येत होते. नंतर, बौद्ध संघमित्रा महाथेरी यांना सम्राट अशोकाने भारतातून श्रीलंकेत पाठवले. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथील रॉयल पार्कमध्ये बोधी वृक्षाची शाखा लावली. ते महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते. तेव्हापासून बौद्ध भिक्षू आणि समर्पित राजांनी त्यांची काळजी घेतली आणि संरक्षित केली. आज या महाबोधी वृक्षाच्या फांदीचे दस-याला नाशिकमध्ये रोपण करण्यात आले.