नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोसायटीचे गेट उघडत असतांना दुचाकी स्वार भामट्यांनी महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील बाटली कारखाना परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदा हरिओम दुंदाले (रा.मिनाक्षी हाईटस शिव कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दुंदाले या गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री वडाळा पाथर्डी रोडवरील बाटली कारखाना भागात राहणा-या आपल्या नणंदच्या घरी गेल्या होत्या. नंदेच्या सोसायटीत जात असतांना ही घटना घडली. सोसायटीचा गेट उघडत असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे २१ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.
…..