बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धुळे आणि मालेगावच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा…भाजप प्रदेशाध्यक्षाची मुख्य निवडणूक अधिका-याकडे मागणी

by India Darpan
जुलै 22, 2024 | 7:57 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
bjp11

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मतदान केंद्र सुसूत्रीकरण व नवीन मतदान केंद्र तयार करताना अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांच्या याद्या तोडून तेथील नावे दुसऱ्या मतदान केंद्रांमध्ये टाकण्यात येऊ नयेत, मतदान केंद्राच्या ठिकाणीच वाढीव मतदान केंद्र त्याच इमारतीत मंजूर करावे, अशा मागण्या भारतीय जनता पार्टी तर्फे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिली. धुळे आणि मालेगाव मध्ये ३ हजार मतदारांच्या नोंदणीमध्ये झालेल्या घोळा प्रकरणी दोन्ही ठिकाणच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही पक्षातर्फे करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे यांनी सांगितले की, शहरांतील मतदारयाद्या सदोष असून निवडणूक आयोग कार्यालयात बसून तांत्रिकरित्या मतदार याद्यांचे विभाजन केल्याने शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी मतदानाचा टक्का घटला होता. आता विधानसभा निवडणुकी आधीही तीच चूक आयोग करत आहे असेही आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी ज्या मतदान केंद्रांवर १५०० पेक्षा अधिक मतदारांची संख्या होती ती संख्या कमी करण्याच्या उद्देशाने सध्या आयोगाचे काम सुरू आहे. मात्र असे केल्यास एकाच वसाहतीतील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात समाविष्ट होऊन मतदानाच्या दिवशी मतदारांना आपापले मतदान केंद्र शोधण्यात अडचणी येतील. ज्या मतदान केंद्रावर मतदार संख्या कमी असेल तिथे जास्त मतदारसंख्या असलेल्या मतदान केंद्रावरील मतदारांची नावे समाविष्ट केल्यास मतदारांचा गोंधळ उडेल. परिणामी मतदानाचा टक्का घसरेल अशी भीती या पत्रातून व्यक्त केल्याचे श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

तसेच धुळे आणि मालेगाव लोकसभा आणि विधानसभेत अशा ३ हजारांहून अधिक मतदारांचे ओळखपत्र, नाव आणि छायाचित्रे एकच असताना निवडणूक आयोगाने याकडे लक्ष का दिले नाही? असा सवाल ही श्री. बावनकुळे यांनी उपस्थित केला. धुळ्यात मतदार म्हणून तीन हजार लोकांची नावे असून, मालेगावमध्येही त्याच लोकांची नावे असल्याचे सांगत श्री. बावनकुळे यांनी या घोळा प्रकरणी धुळे, मालेगावच्या निवडणूक अधिका-यांना निलंबित करावे आणि जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विविध नगर पंचायतींमधील आणि एका नगरपरिषदेतील रिक्त जागांसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारे पत्र राज्य निवडणूक आयुक्त श्री.मदान यांना दिल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रेस वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत पुन्हा कामगार पॅनल…सर्व जागा जिंकत मिळवले वर्चस्व

Next Post

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर

India Darpan

Next Post
cm eknath shinde 2

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011