नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– २४ ते २८ जुलै २०२४ दरम्यान कावासाकी, जपान येथे एशियान जंप रोप चैम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये भारतातून ४० खेळाडूचा संघ सहभागी होणार आहे. या चाळीस खेळाडूमध्ये महाराष्ट्रातल्या नाशिक आणि ठाणे येथील खेळाडूंचा समावेश आहे.
यामध्ये राजुल लुंकड, नमन गंगवाल, रोनक साळवे, ईशान पुथरण,मानस मुंगी आणि सुकृत बेंडाले तर मुलींमध्ये भूमिका नेमाडे, तन्वी नेमाडे, पारोल झनकर, भार्गवी पाटील, श्रिया वाणी, अंकिता महाजन, पद्माक्षी मोकाशी यांचा समावेश आहे. या संघाचे प्रमुख म्हणून अशोक दुधारे, प्रक्षिक्षक अमन वर्मा, तन्मय कर्णिक, निमिष शेटे यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू जपान येथे आयोजित एशियन जंप रोप स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.
जपान येथे ११ देशाचे ७८४ खेळाडू सहभाग नोंदवणार आहेत. आज २२ जून रोजी पहाटे हे खेळाडू मुंबई विमानतळावरून जपान येथे रवाना झाले. हे खेळाडू चांगला खेळ करतील आणि जास्तीत जास्त पदके मिळवितील असा विश्वास या संघाचे प्रशिक्षक तन्मय कर्णिक यांनी दिली.