मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर ही बैठक २० मिनिटे बंद दाराआड झाली. पण, या बैठकीतील चर्चेचा तपशील समोर आला नाही.
या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीत मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना सरकारने जे आश्वासन दिलं होतं, याबाबत चर्चा नसल्याने विरोधी पक्षात नाराजी होती. पण आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी चर्चा केली.
आगामी काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण विरोधकांनाही देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शरद पवारांना आश्वासन दिले. त्यामुळे आता सरकार पुन्हा या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे.