इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – सत्र पूर्तता संपलेल्या २०१३-१४ पासूनच्या ९० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. या सर्वांचे PRN ओपन होणार आहे. विद्यापीठाने सर्व परवानग्यांचे सोपस्कार पूर्ण केले आहे. कुलगुरू, विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिलचे मेंबर आणि परीक्षा विभाग प्रमुखांनी UGC आणि संबंधितांशी पत्र व्यवहार करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. पुणे,नगर, नाशिक जिल्ह्यातील एकूण ९० हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होईल. या निर्णयासाठी गेले काही दिवस पुणे विद्यापीठाचे प्रमुख प्रयत्न करत होते. तो निर्णय आता झाला आहे
या निर्णयामुळे लॅासह सरसकट सर्वांना फायदा होणार आहे. लास्ट आणि सेकंड लास्ट इयर अनुत्तीर्ण असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागा. यशस्वी व्हा. आता नाही तर परत कधीच होणार नाही हे लक्षात असू द्या.. तुम्ही नशीबवान आहात ही संधी तुम्हाला मिळाली आहे असे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॅान्सिलच्या मेंबरने सांगितले आहे.
या विद्यार्थ्यांना फायदा
2013 पॅटर्नच्या
BA – 41,000
बीकॉम – 31,288
B.Sc. – 7,986
BCA – 1,229
M.com. – 2515
याव्यतिरिक्त लाँ, बीएड आदी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय
बीएडचे विद्यार्थी सर्वप्रथम भेटले. त्यानंतर इतर कोर्सेस, लाँ अशी यादी वाढत गेली. गेली 5 महिने यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील होतो. परीक्षा विभागाने अतिशय कुशलपणे माहिती गोळा करून मांडणी केली. कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी UGC कडे पाठपुरावा सुरू केला. अकॅडमीक कौन्सिलची परवानगी मिळवली. त्यामुळे विद्यार्थी हिताचा हा निर्णय होऊ शकला…
सागर वैद्य,
मॅनेजमेंट कौन्सिल मेम्बर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ