शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्याने विकसित करण्यात आलेल्या गोविंदनगरच्या सदाशिवनगर येथील जॉगिंग ट्रॅकची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली आहे. या ट्रॅकच्या निकृष्ट कामाची चौकशी करा, उपाययोजना करून वापरायोग्य करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना सोमवारी, २२ जुलै रोजी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
गोविंदनगरच्या सदाशिवनगर येथील जॉगिंग ट्रॅक महापालिकेने शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्यानंतर विकसित केला. सपाटीकरण व्यवस्थित केलेले नाही, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केलेली नाही, निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. यामुळे पहिल्याच तुरळक पावसात या ट्रॅकवर तळे निर्माण झाले आहे. जॉगर्सना याचा वापर करणे कठीण झाले आहे. उपाययोजना करून ट्रॅकची दैन्यावस्था दूर करावी, तो वापरायोग्य करावा, निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, रमेश गावीत, जगन्नाथ पवार, राजेंद्र वडनेरे, प्रवीण सूर्यवंशी, संजय बावीस्कर, अमित पवार, नाना जगताप, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, दिलीप निकम, बाळासाहेब देशमुख, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, बाळासाहेब राऊतराय, आनंदराव तिडके, निलेश ठाकूर, मनोज वाणी, सतीश मणिआर, दिलीप दिवाणे, भारती देशमुख, प्रतिभा पाटील, वंदना पाटील, हरिष काळे, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील, पुरुषोत्तम शिरोडे आदींनी केली आहे. निवेदनाची दखल घेवून कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.