इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले आहे. त्यामुळे त्यांचे दौरे आता वाढले आहे. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत. तीन ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याचा, तर चार ऑगस्टला ते दिल्लीला जाणार आहेत.
मुंबईतून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुका जाहीर होण्याआधीच त्यांनी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असून, ते जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर आता ठाकरे यांनी विधानसभेसाठी रणनीती आखली आहे.
ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन ऑगस्ट रोजी पुण्यात पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात पदाधिकाऱ्यांना ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.