इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : कावड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकाचे नाव लिहिणे बंधनकारक असल्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयाला मोठा झटका दिला आहे. योगी सरकारच्या खाद्यपदार्थ व दुकानदारांच्या नावासंदर्भातील निर्णयाला स्थगिती दिली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने कावड मार्गवर पावित्र्य राखण्याच्या नावाखाली खाद्यपदार्थांच्या प्रत्येक दुकान व हातगाड्यांवर संबंधित मालकाचे नाव सांगणारा बोर्ड लावणे बंधनकारक केले होते. कावड यात्रेत सहभागी झालेल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समर्थन योगी आदित्यनाथ यांनी केले होते. या शासन निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या बाजूचे ढाबे, फूड स्टॉल अशा प्रत्येक मालकाने नावाचा बोर्ड लावण्यास सुरुवात केली होती. काहींनी योगी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यात खाद्यपदार्थांच्या दुकानदारांस मोठा दिलासा मिळाला आहे.