इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेत मान्सून सत्राच्या अधिवेशनाच्या पहिल्यात दिवशी विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी पेपरफुटीचा मुद्दा लावून धरत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेससहित सपा आणि डीएमके पक्षाच्या खासदारांनी मिळून नीट परीक्षा रद्द करावी अशी मागणी यावेळी केली. त्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांनी संताप व्यक्त करत मागील सात वर्षात पेपर फुटला नाही, कोणतेही पुरावे आढळले नाहीत असे सांगून नीट परीक्षेंचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. एनटीए एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा सुरु झाल्यानंतर कोणतीही पेपरफुटीची घटना आली नाही असे त्यांनी सांगितले.
संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी देशाचे आर्थिक सर्वेक्षण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत मांडले जाईल तर उद्या मोदी सरकार बजेट जाहीर करेल. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी व विरोधी पक्षनेत्यांनी पेपरफुटीचा मुद्दा उपस्थितीत केला.
यावेळी केंद्रीय शिक्षा मंत्री धमेंद्र प्रधान यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला मला कोणाकडून माझ्या शिक्षणाचे आणि संस्काराचे प्रमाणपत्र नकोय, मला येथे लोकांनी निवडून आणले आहे. पीएम मोदींनी शिक्षण खात्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेत्यांनी शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढणे म्हणजे दुर्भाग्य आहे अशा शब्दात शिक्षण मंत्र्यांनी राहुल गांधी यांनी प्रत्त्युत्तर दिले.