नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकाने ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना जेलरोड येथील टाकळीरोड भागात या घटनेत मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती बाळासाहेब शिंदे (रा.सन सिटी बिल्डींग समोर खर्जुळ मळा) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे यांची एमएच १५ जीपी २२३० स्प्लेंडर दुचाकी रविवारी (दि.२१) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ही घटना घडली. शिंदे यांचे आर्थिक नुकसान व्हावे या हेतूने अज्ञात समाजकंटकांनी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली होती. या घटनेत मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले असून हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.