मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे दुरुस्ती आणि देखभाल सुरु असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजावर २१ जुलै रोजी संध्याकाळी आग लागली. जहाजावर नियमित देखभालीचे काम करत असताना जहाजावरील कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे लक्षात आले. जहाजाच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवण्यास सुरुवात केली. नौदल डॉकयार्ड, मुंबई आणि आसपासच्या इतर युनिट्सच्या अग्निशमन दलाने आग शमवण्यात मदत केली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नौदल अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.









