नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बागलाण तालुक्यातील आदिवासी भागातील साल्हेर पायरपाडा येथील शेतक-याच्या शेतात बिबट्याचा बछडा रात्रीच्या वेळी शिकारीच्या नादात विहिरीत पडला. सकाळी शेतकरी गोविंदा देशमुख यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले असून बिबट्याला बाहेर काढण्यात आले.









