इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः अजित पवार यांचा गुलाबी जॅकेट चर्चा असतांना आता एका केकची राज्यभर चर्चा आहे. ‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो,’ की असा मजकूर असलेला हा केक अजितदादांनी कापला त्यानंतर ही चर्चा सुरु झाली.
अजितदादा पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच केक कापत वाढदिवस साजरा केला; पण या वेळी चर्चा सुरू झाली ती त्यांच्या केकची. अजितदादांसाठी आणलेल्या केकवर ‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!’, मजकूर लिहिण्यात आला होता.